नगर : भारतवासीयांचं तब्बल ५०० वर्षांपासूनचं असलेले राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झालं आणि प्रभू श्रीराम (Shree Ram) अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले. काल (ता.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला.
नक्की वाचा : मराठा आरक्षणाबाबत बोलताना जरांगे पाटील भावुक
प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वसामान्यांना घेता येणार (Ram Mandir Darshan)
अयोध्येत श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यानंतर आज अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वसामान्यांना घेता येणार आहे. रामभक्त आजपासून मंदिरात जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. रामल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अयोध्येतील पारा ६ अंशावर आहे. अत्यंत कडाक्याच्या थंडीतही भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सोमवारी (ता.२२) शुभ मुहूर्तावर श्रीरामाचा अभिषेक विधीवत पार पडला.
अवश्य वाचा : मनोज जरांगेंचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर येणार
सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत घेता येणार (Ram Mandir Darshan)
भाविकांना रामलल्लांच दर्शन सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत घेता येणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत मंदिर बंद राहिल, त्यानंतर पुन्हा दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे. राममंदिरात दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामाची भोग आरती होणार आहे. तर संध्याकाळी ७. ३० वाजता देखील आरती होणार आहे. यानंतर ८. ३० वाजता शेवटची आरती करून प्रभू श्रीरामाची निद्रेची वेळ होईल, त्यानंतर मंदिर बंद होणार आहे. रामाच्या आरतीसाठी पास घ्यावे लागतील, ते ऑनलाईन आणि ऑफलाईन घेता येतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईट वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून ऑफलाईन पास मिळवता येणार आहे.