Manoj Jarange Patil : मराठा पदयात्रा; लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे’, जोरदार घोषणाबाजीत मराठ्यांचं वादळ नगरमधून मुंबईकडे रवाना

Manoj Jarange Patil : मराठा पदयात्रा; लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे', जोरदार घोषणाबाजीत मराठ्यांचं वादळ नगरमधून मुंबईकडे रवाना

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : एक मराठा, लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, लढेंगे और जितेंगे, हम सब जरांगे, अशा एक ना अनेक घोषणा देत, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समवेत असंख्य मराठा समाजबांधव (Maratha Samajbandhav), महिला, युवकांनी आज साेमवार (ता. २२) सकाळी नगरमधून मुंबई (Mumbai) च्या दिशेने प्रस्थान केले.

हे देखील वाचा : छाताडावर गोळ्या झाडल्या तरी आता एक इंच मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil

असंख्य मराठा बांधव पदयात्रेत सहभागी : (Manoj Jarange Patil)

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहे. गळ्यात कवड्याची माळ, भगवा रुमाल, पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेल्या जरांगे पाटील माेर्चाचे नेतृत्त्व करत हाेते. त्यानंतर विविध घोषणा देत नगर येथून पायी रॅली मुंबईच्या दिशेने निघाली. नगर येथील महिलांनी मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण केले. जरांगे पाटलांसह असंख्य मराठा बांधव व महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा, मराठा बांधवाच्या डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे होते. मराठा आंदोलक विविध घोषणा देत असल्याने महामार्ग व परिसर दणाणून गेला होता.

Manoj Jarange Patil

नक्की वाचा : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पहा ‘आय लव्ह नगर’वर

ठिकठिकाणी पाेलिसांचा माेठा फाैजफाटा तैनात (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बाराबाभळी येथून सोमवारी सकाळी निघाली. भिंगार शहर, स्टेट बँक चाैक, चांदणी चौक, माळीवाडा, स्वस्तिक चौक, सक्कर चौक ते केडगाव मार्गे पुण्याकडे जाणार आहे. पदयात्रेत मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव सहभागी झाले आहेत. त्यामुळे कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पदयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी पाेलिसांचा माेठा फाैजफाटा तैनात हाेता. पोलीस व स्वयंसेवक वाकीटॉकीद्वारे एकमेकांच्या संपर्कात हाेते.

अवश्य वाचा : मराठा आरक्षणाबाबत सरकारची अजूनही टाळाटाळ – सुरेश इथापे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here