Manoj Jarange Patil : छाताडावर गोळ्या झाडल्या तरी आता एक इंच मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : छाताडावर गोळ्या झाडल्या तरी आता एक इंच मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : पाथर्डी : आता मराठा आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची असून ही शेवटची आरपारची लढाई आहे. सरकारने आम्हाला कितीही त्रास दिला, आमच्या छातीवर गोळ्या झाडल्या, तरी पण हा तुमचा मुलगा मनोज जरांगे पाटील एक इंच ही मागे हटणार नाही, हा तुम्हाला शब्द देतो. गेली ४२ वर्ष आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा दिले नाही. आता हे आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्हाला सात महिन्याचा अवधी दिला. आता आम्हाला आरक्षणच हवे, तुम्हाला एक तासाचाही आम्ही वेळ देणार नाही, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तालुक्यातील आगासखांड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मराठा समाजासह इतर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Manoj Jarange Patil

हे देखील वाचा : मराठा आरक्षणाबाबत सरकारची अजूनही टाळाटाळ – सुरेश इथापे

तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो आहे (Manoj Jarange Patil)


जरांगे पाटील म्हणाले, सरकार मराठा आरक्षणासाठी वेळ काढूपणा करत असून आंदोलन सुरू झाल्यापासून सात महिन्याचा वेळ दिला. मात्र, आरक्षणाचा तिढा काही सुटत नाही. तुम्ही कसे मराठ्यांना आरक्षण देत नाही ते मी आणि माझे मराठी बांधव मुंबईत आल्यावर बघून घेऊ. आरक्षण द्या, बाकी आम्हाला काहीच सांगू नका, मराठे तुमच्या धमक्यांना घाबरणारे नाहीत. मराठा आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. मराठा आरक्षण हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी मिळाला पाहिजे, त्यासाठी हा संघर्ष चालू आहे, मी काही चुकीचं यामध्ये करत नाही. सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आपण आता यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो आहे. मी परत येईल की नाही, हे मला माहित नाही. मात्र, मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

नक्की वाचा : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पहा ‘आय लव्ह नगर’वर | I LOVE NAGAR

आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही (Manoj Jarange Patil)

वेळप्रसंगी हातातील कामे सोडून रस्त्यावर उतरा. आपल्या मतांच्या जीवावर यांनी राजकरण केले असून आता आरक्षण दिले नाही तर यांना सळो कि पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे. मला कोणत्याही गोष्टीचा मोह नसल्याने कोणतेही आमिष मला सरकार देऊ शकत नाही. मी सरकारला मॅनेज होत नसल्याने सरकारची अडचण झाली आहे. माझा जीव गेला तरीही बेहत्तर पण आरक्षण मिळाल्याशिवाय आता मी माघार घेणार नाही. सुरू असलेला लढा शांततेत सुरू आहे. मात्र, जर सरकारने जाणून बुजून षडयंत्र रचून हा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हा सर्वांना या मुंबईकडे चालणाऱ्या लेकरांकडे पाठीशी अतिशय ताकतीने ठामपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

अवश्य वाचा : प्रभू श्रीरामांचा आदर्श घेत मोदींचे राम राज्य – वसंत लोढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here