Ram Shinde : संत एकनाथ व वामनभाऊ महाराज पायी दिंडीचे स्वागत; सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती

Ram Shinde : संत एकनाथ व वामनभाऊ महाराज पायी दिंडीचे स्वागत; सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती

0
Ram Shinde : संत एकनाथ व वामनभाऊ महाराज पायी दिंडीचे स्वागत; सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती
Ram Shinde : संत एकनाथ व वामनभाऊ महाराज पायी दिंडीचे स्वागत; सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती

Ram Shinde : नगर : खर्डा (ता.जामखेड) येथे संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj)संत वामनभाऊ (Sant Vamanbhau) महाराज यांच्या पायी दिंडीचे सोहळ्यांचे जामखेड येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले व सोहळ्यात सहभागी होत भाविकांमध्ये उत्साह निर्माण केला.

नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

संत एकनाथ महाराज पादुकांचे घेतले दर्शन

संत एकनाथ महाराज पालखी खर्डा येथे मुक्कामी होती. सकाळी पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यापूर्वी प्रा. शिंदे यांनी पादुकांचे दर्शन घेतले. खर्डा ही संत एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्गातील महत्त्वाची व भक्तिभावाने नटलेली भूमी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, चिंचोली (नाथ), जि. बीड येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत वामनभाऊ महाराज पायी दिंडीचेही जामखेड येथे स्वागत करण्यात आले. महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे प्राथमिक स्वरूपात सत्कार करून त्यांच्या अध्यात्मिक सेवेस कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई

वारकऱ्यांच्या सोयीसाठी रेनकोट वाटप (Ram Shinde)

वारकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रेनकोट वाटप उपक्रम राबवण्यात आला.पालखीचे स्वागत पालखी चालक रघुनाथबुवा व योगेश महाराज (गोसावी) यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रा. मधुकर राळेभात, रवींद्र सुरवसे, संजीवनी पाटील, शरद कार्ले, संजय गोपाळघरे, भागवत सुरवसे, महेश दिंडोरे, राजू मोरे, महालिंग कोरे, गणेश शिंदे, प्रशांत कांबळे, आकाश खेडकर, सोनु सुरवसे, भगवान मुरूमकर, संजय काशीद, बापूराव ढवळे, गणेश जगताप, राहुल बेदमुथा, अमित चिंतामणी, प्रवीण सानप, गोरख घनवट यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले.