Ram temple | नगर : बाबर भारतात आल्यावर हिंदुंना अपमानित करून हुकुमत गाजवण्यासाठी त्याने अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) तोडून तिथे मस्जिद बांधली. मात्र ‘रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देत विश्व हिंदू परिषदने देशभर आंदोलन छेडून कारसेवा सुरू केली. रामजन्मभूमीला पुन्हा प्राप्त करून जेथे रामाचा अपमान झाला त्याचं परिमार्जन व प्रक्षालनं तेव्हाच होईल जेव्हा त्याच ठिकाणी त्याच जागेवर राममंदिर उभारले जाईल. या दृष्टीने तेथेच भव्य श्रीराम मंदिर उभारून झालेल्या अपमानाचा बदला घेतला आहे. २२ जानेवारीला आपण सर्वांनी मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला. आता देशात खऱ्या अर्थाने रामराज्य येणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे (BJP) माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी केले.
हे देखील वाचा : अध्यादेशाला धाेका झाल्यास आझाद मैदानावर आलाेच म्हणून समजा; मनाेज जरांगेचा इशारा
नगरमध्ये मागील १४ वर्षांपासून राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या भारत भारती संस्थेतर्फे देशाच्या अमृत महोत्सवी गणतंत्र दिनानिमित्त भारत माता पूजन, देशातील सर्व राज्यातील खाद्य संस्कृतीचे फूड फेस्टिव्हल व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम अशा त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल संजोग येथे केले होते. भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या हस्ते श्रीराम पंचायतन मूर्तींचे पूजन, भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ‘राम मंदिर ते रामराज्य’ या विषयावर सुनील देवधरांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अभिनेते गिरीश कुलकर्णी, भारत भारतीचे अध्यक्ष कमलेश भंडारी, महिलाध्यक्षा विनया शेट्टी उपस्थित होत्या.
नक्की वाचा : वकील दाम्पत्याचा खंडणीसाठी केला खून; चार जण पोलिसांच्या ताब्यात
देशात रामराज्य येण्यास सुरुवात (Ram temple)
सुनील देवधर पुढे म्हणाले, देशात रामराज्य येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीपासूनच काम करत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे या पूर्वीच देशात रामराज्य येण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत देशात महिलांची उपेक्षाच झाली होती. महिला पंतप्रधान इंदिरा गाधींना, सत्तेत असताना सोनिया गांधींना महिलांच्या समस्या कधीच दिसल्या नाहीत. मात्र, मोदींनी महिलांना प्राधान्य देत अनेक सुविधा दिल्या. सर्वसामान्यांना आयुष्यमान भारत योजनेद्वारे ५ लाखाचे उपचार दिले, स्टार्टअप इंडिया सारख्या योजना, भारतातच व्हॅक्सिन बनवून नागरिकांना मोफत लस देवून कोविड पासून देशाला वाचवले. आता चीन-पाकिस्तानची आमच्याकडे बघण्याची हिंमत होत नाही. हे रामराज्य नाही का? सर्वांनपर्यंत विकासाची किरणे पोहोचवत देशात रामराज्य आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांपासून करत आहेत. पूर्वीपासून आपल्याकडे महिलांना मनाचे व आरंभाचे स्थान दिलेले आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यात महिलांचाही सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे नगरच्या भारत भारतीने महिला शाखा सुरू करून योग्य काम केले आहे. नगरमध्ये अनेक वर्ष आरएसएसचे काम केलेले असल्याने अजूनही नगरशी ऋणानुबंध आहे.
हे देखील वाचा: राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
अभिनेते गिरीश कुलकर्णी म्हणाले, आपला भारत देश खूप मोठा असून अद्वितीय आहे. देश पाहण्यासाठी पूर्ण जन्म अपुरा पडेल. भारतीय चित्रपट सृष्टीने नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाज परिवर्तनाचे काम केले आहे. तरुणांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देत सृजन व सर्जनशील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
हे देखील वाचा : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू
भारताचा वनवास संपायला (Ram temple)
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, २०१४ वर्षापासूनच भारताचा वनवास संपायला सुरुवात झाली आहे. २२ जानेवारीला झालेला कार्यक्रम न भुतोनभविष्यती असाच झाला आहे. त्यामुळे देशात पुन्हा रामराज्य येणार हे नक्की. भारता भारतीच्या या कार्यक्रमाचे कुतूहल होते. आज उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. विनया शेट्टी यांनी महिला आघाडीच्या कार्याची माहिती दिली. श्रेया देशमुख, चिराग शहा व हिरालाल पटेल यांनी परिचय दिला. मिलिंद कुलकर्णी व वीणा दिघे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अशोक मवाळ यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकारांनी विविध राज्यांची सांस्कृतिक परंपरा दर्शवणारे विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थित हजारो नागरिकांची मने जिंकली. यानिमित्त आयोजित फूड फेस्टिव्हलमध्ये सर्व राज्यांच्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद नगरकरांनी घेतला.
अवश्य वाचा : रामदास आठवलेंचा नगर दाैऱ्याआधी आरपीआय गटात घमासान
यावेळी उपाध्यक्ष रमेश रासने, समीर बोरा, सचिव संदीप कोद्रे, सहसचिव चिराग शहा, कोषाध्यक्ष हिरालाल पटेल, हरीष हरवाणी,चंद्रशेखर आरोळे, दिनेश छाब्रिया आदींसह भारत भारतीचे सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत भारतीच्या सदस्यांनी व प्रायोजकांनी सहकार्य केले, यावेळी माजी अध्यक्ष राजू लक्ष्मण, मोहनलाल मानधना, राजाभाऊ मुळे, बाबुशेठ टायरवाले, डॉ.रवींद्र साताळकर, वाल्मिक कुलकर्णी, स्विटी पंजाबी, मधुरा कोद्रे आदी उपस्थित होते.