नगर : उद्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) राजधानी दिल्लीत राजपथावर (Rajpath) होणाऱ्या पथसंचलनात ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ हा चित्ररथ दिसणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या (Chitrarath) देखाव्यावरील संपूर्ण शिल्प (Sculpture) यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळचे नाव आता राजधानी दिल्लीतही घेतले जाणार आहे.
नक्की वाचा : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा नवा टीझर आऊट; एकदा पहाच !
शिवराज्याभिषेकाला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहे. याचे निमित्त साधत प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान :छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांनी या चित्ररथातील शिल्प साकारले. चित्ररथाची पहिली झलक कर्तव्य पथावरील (दिल्ली) तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली. चित्ररथ साकारणाऱ्या कलावंतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील कलावंतांचा मोठा वाटा आहे.
भारताच्या चित्ररथात नेमके काय ? (Republic Day Parade 2024)
‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान :छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील राज्याच्या चित्ररथामध्ये महाराजांचा लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह माँ जिजाऊंची प्रतिकृती पाहायला मिळालीय. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक तराजू, संभाजी महाराज, कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य आहेत. सोबतच, हिरकणी, दिपाई बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात दाखवण्यात आल्या आहे.
अवश्य वाचा : तलाठी भरती २०२३ ची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर
यवतमाळ जिल्ह्यात साकारण्यात आला चित्ररथ (Republic Day Parade 2024)
भारताचा हा चित्ररथ साकारताना तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. तर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार हा या शिल्पकला विभागाचा प्रमुख आहे. त्याच्या समुहामध्ये भूषण हजारे, सूरज गाऊत्रे, पिंटू भोंग, नितेश बावणे, अक्षय बावणे, योगेश वहिले, अविनाश बावणे, निखिल दूर्षेट्टीवर, अरुण मेश्राम, सुमीत कानके आदी शिल्पकारांचा समावेश आहे. पाटणबोरी येथील यशवंत यांच्या स्टुडिओमध्ये या चित्ररथातील शिल्प साकारले आहे.
हेही पहा : मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास हायकाेर्टाचा नकार; गुणरत्न सदावर्तेंची मागणी फेटाळली