नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis)यांनी सुधारित पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) लागू करणार असल्याची घोषणा केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या एक रुपया पीक विमा योजनेबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam terrorist attack) कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.
नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार
एक रुपयात पीक विमा योजनेबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले? (Crop Insurance Scheme)
मागील काळात पीक विमा योजना चालवत होतो.त्यामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत.एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्यानंतर लाखो बोगस अर्ज या पाहायला मिळाले. हजारो कोटींचा अपव्यय होतोय,असे षडयंत्र लोकांनी केले. गरजू शेतकरी ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करुन सुधारित पद्धतीनं योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपनीचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे,अशा प्रकारे ही विमा योजना नव्यानं तयार करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, ड्रीप, मल्चिंग पेपर, बीबीएफ अशा वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यात गुंतवणूक वाढवायची यासाठी स्वतंत्र योजना मंत्रिमंडळानं मान्य केली आहे,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नेमका निर्णय काय ?(Crop Insurance Scheme)
सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबींवर आधारित पीकविमा योजना राबवण्यात येईल. तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवली जाणार असल्याच शासन निर्णयात म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना मदत (Crop Insurance Scheme)
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो सोडवणं, रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे.