Rohit Pawar : नगर : जामखेड तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी (Kukdi) कालव्याचे आवर्तन (circulation) उद्या (ता. ५) रोजी सोडले जाणार आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन १५ डिसेंबर रोजी सुटणारे आवर्तन १० दिवस अगोदरच सुटणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला (agriculture) आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
हे देखील वाचा : तेलंगणात भारतीय वायुसेनेच्या विमानाचा अपघात ; २ जणांचा मृत्यू
यंदा पावसाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ कालवा सल्लागार समितीची अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहून कुकडी प्रकल्पाचे रब्बी हंगामातील आवर्तन २५ नोव्हेंबर रोजी सोडावे, अशी विनंती केली.
नक्की वाचा : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या’ – सुप्रिया सुळे
त्याचबरोबर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांना आपल्या स्तरावरुन मागणी करावी, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता १० दिवस अगोदरच कुकडीचे आवर्तन सोडले जाणार आहे. यामुळे कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ५४ गावातील शेतकऱ्यांची आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.