Rohit Pawar : छापेमारी मागे थेट दिल्ली कनेक्शन : रोहित पवार

Rohit Pawar : छापेमारी मागे थेट दिल्ली कनेक्शन : रोहित पवार

0
Rohit Pawar : छापेमारी मागे थेट दिल्ली कनेक्शन : रोहित पवार
Rohit Pawar : छापेमारी मागे थेट दिल्ली कनेक्शन : रोहित पवार

Rohit Pawar : नगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) या कंपनीवर धाडी पडल्या आहेत. ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी कंपनीच्या राज्यातील सहा कार्यालयावर धाडी मारल्या. या कारवाईमुळे परदेश दौऱ्यावर असणारे रोहित पवार यांना परदेश दौरा सोडून मायदेशी परतावं लागलं आहे. मायदेशी येताच रोहित पवार यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.

नक्की वाचा : ईव्हीएम मशिन हटवा, लाेकशाही वाचवा; बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची विराेधकांची मागणी

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या सहा कार्यालयावर एकाचवेळी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये आठ ते नऊ तास ही छापेमारी सुरू होती. या छापेमारीत अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. छापेमारीची माहिती मिळाल्यानंतर रोहित पवार तातडीने पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. या छापेमारी मागे थेट दिल्ली कनेक्शन असल्याचे विधानही रोहित पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : काँग्रेसने ४८ जागांवरील इच्छुकांची मागवली नावे; मित्रपक्ष बुचकळ्यात

गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं? भाजपचं कोण गेलं होतं? आणि अजितदादा मित्र मंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं? त्यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येईल.

या विषयावर आत्ताच मी अधिक बोलणार नाही, या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग काही नाही. कारवाई सुरू आहे. आम्ही आवश्यक टी सर्व कागदपत्र देऊन सहकार्य करत आहोत. सत्तेत असलेले नेते मोठ्या आवाजात बोलत आहेत. मी चूक केली असती तर मी परदेशातून आलो नसतो. नाही तर अजितदादांबरोबर भाजपात जाऊन बसलो असतो. पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. आमचा लढा सुरू आहे. ईडी असो किंवा कोणताही विभाग असो, आम्ही त्यांना मदत करत राहू, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

घोटाळा कधी?
घोटाळ्याबाबत भाष्य करतांना रोहित पवार म्हणाले की हे लोक ज्याला घोटाळा म्हणत आहेत. तो कधी झाला? बँकेवर प्रशासक कधी होते? प्रशासक नेमलेले असताना कोणत्या कंपन्या विकल्या गेल्या आहेत? ज्यांच्यावर कारवाई सुरू होती, त्यांची यादी मागितली होती. त्या यादीत कुणाकुणाची नावे होती. ती माणसं त्याच पक्षात आहे की भाजपमध्ये गेले याचा अभ्यास करा. तुमच्या लक्षात येईल. हे सर्व असताना तुम्ही एकालाच का टार्गेट करताय हे सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here