नगर : आयपीएलच्या (IPL 2024) ३१ व्या मॅचमध्ये संजू सॅमसन याच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Roylas) श्रेयस अय्यर च्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्सचा(Kolkata Night Riders) दोन विकेटनी पराभव केला. ईडन गार्डन्सवर हा सामना पार पडला. जोस बटलर च्या शतकी कामगिरीच्या जोरावर राजस्थानने केकेआरचा पराभव केला.
नक्की वाचा : २०२३ च्या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; निकालात महाराष्ट्राचा डंका
जोस बटलर कोलकाता संघावर भरला भारी (RR vs KKR)
कोलकाताने दिलेल्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकटा जोस बटलर कोलकाता संघावर भारी पडला. राजस्थानने २२४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत पंजाब किंग्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बटलरने ६० चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०७ धावा करत संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. रोव्हमन पॉवेलने अखेरच्या षटकांत येऊन ३ षटकार लगावले. ज्यामुळे बटरलला ही मोठी धावसंख्या गाठण्यास मदत झाली. रोव्हमन पॉवेलने बाद होण्यापूर्वी १३ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह २६ धावांची शानदार खेळी केली.
अवश्य वाचा : मराठी साहित्यातील मानाचं पान असलेला ‘फकिरा’ चित्रपट रुपेरी पडद्यावर
राजस्थान संघाची फलंदाजीची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल १९ धावा करत बाद झाला. तर संजू सॅमसनही मोठी खेळी करू शकला नाही. रियान परागने बटलरसोबत चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. तो ३४ धावा करत हर्षित राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर ध्रुव जुरेल (२),अश्विन (८) झटपट बाद झाले. तर शिमरॉन हेटमारला चक्रवर्तीने गोल्डन डकवर बाद करत राजस्थानला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या रोव्हमन पॉवेलने एक शानदार खेळी केली आणि बटलरवरील धावांचे ओझे कमी केले. तर ट्रेंट बोल्ट बटलरला स्ट्राईक देताना धावबाद झाला. पण त्यानंतर बटलरने तुफान फटकेबाजी करत आपले शतकही झळकावले आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.
केकेआरकडून ६ बाद २२३ धावा (RR vs KKR)
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ६ बाद २२३ धावा केल्या. केकेआरकडून सलामीवीर सुनी नरेनने पहिले आयपीएल शतक झळकावत ५६ चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांसह १०९ धावा केल्या आहेत. अंग क्रिश रघुवंशीने नरेन सोबत चांगली भागीदारी केली. बोल्टने नरेनला क्लीन बोल्ड करत बाद तर केले पण यॉर्कर टाकत त्याने स्टंपही तोडला. याशिवाय सर्व फलंदाज ३० धावांच्या आधीच बाद झाले. फिल सॉल्ट १० धावा करत आवेश खानच्या शानदार झेलवर बाद झाला. श्रेयस अय्यर ११ धावा करत चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर रसेल आणि रिंकू सिंग झटपट धावा करत बाद झाले. पण नरेन संघाला चांगली सुरूवात करून दिल्याने संघाने २०० धावांचा टप्पा सहज गाठला.