Sangram Jagtap : नगर : राज्य सरकार (State Government) कडून मिळवलेल्या निधीतून शहरात दोन अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे (Sports Complex) कामे प्रगतीपथावर आहेत. यातील सारसनगर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले असून लवकरच खेळाडूंसाठी (Athletes) उपलब्ध होणार आहे. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे क्रीडाक्षेत्राला अधिक चालना व बळकटी मिळणार असून खेळाडूंची चांगली सोय होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.
नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
सारसनगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाची पाहणी
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर शहरात सारसनगर व गंगा उद्यान परिसरात असे दोन अद्यावत भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहेत. मंगळवारी (ता.२५) रोजी आ. जगताप यांनी सारसनगर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रा.माणिक विधाते, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, मनापा अभियंता श्रीकांत निंबाळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आ.जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)
शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलचा विकास झाला नसल्याने शहरातील खेळाडू चांगल्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून व पुरावा करून शहरात दोन अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी निधी उपलब्ध केला. सर्व क्रीडा संघटनांना बरोबर घेत या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे कामे सुरु केले आहेत. या अद्यावत व भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे शहरातील विविध क्रीडा प्रकारांना मोठी चालना मिळणार असून येथे सराव व स्पर्धा होणार आहेत. यावेळी जॉय लोखंडे, राहुल बोरुडे, संतोष ढाकणे, गजानन भांडवलकर, चंद्रकांत औशीकर, अमोल नांगरे आदी उपस्थित होते.
सारसनगर मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इन डोअर खेळांसाठी दोन एकर जागेत दोन मजली इमारत उभारण्यात येत आहे. तळमजल्यावरील भव्य बॅडमिंटन हॉल मध्ये दोन बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस हॉल, स्वागत कक्ष प्रशासकीय कार्यालय, प्रशिक्षक रूम, खेळाडूंसाठी चेंजिंग रूम. पहिल्या मजल्यावर सुमारे १०० प्रेक्षकांची क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी, तसेच विविध खेळांसाठी सराव हॉल देखील आहेत. तसेच व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस, कबड्डी कोर्ट, बॉक्स क्रिकेट, योगा आणि झुम्बासाठी जागा व बाहेरील मैदानात भव्य जॉगिंग ट्रक अशी रचना असणार आहे, अशी माहिती आर्किटेक्ट रोहित साळुंके यांनी दिली.