Sangram Jagtap : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sangram Jagtap : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगरमधील मुस्लिम समाजातर्फे (Muslim community) आज (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयावर (District Collector’s Office) मोर्चा काढत अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या विरोधात निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यास किती जण जाणार यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये थोडावेळ शाब्दिक बाचाबाची झाली होती. शिष्टमंडळातील मोजक्या लोकांनी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) निवेदन दिले.

नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

निलंबित करण्याची मागणी

यावेळी मुस्लिम समाजाकडून आमदार संग्राम जगताप हे मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत. संविधानाच्या विरोधात त्यांचे वक्तव्य असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई

जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप

महाराष्ट्रात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर जिल्ह्यातील काही लोकं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील वातावरण खराब होऊ नये यासाठी विनंती केली आहे. तसेच या लोकप्रतिनिधींना बडतर्फ करण्यासाठी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला पत्र देऊन विधानसभा सदस्य पद रद्द करण्याची मागणी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केली आहे.