Sangram Jagtap : इंदोर प्रमाणे आपल्या नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास : आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap : इंदोर प्रमाणे आपल्या नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास : आमदार संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : इंदोर प्रमाणे आपल्या नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास : आमदार संग्राम जगताप
Sangram Jagtap : इंदोर प्रमाणे आपल्या नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास : आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : देशातील सर्वात स्वच्छ शहर (Clean City) म्हणून ओळख असलेल्या इंदोर (Indore) शहराचा आदर्श घेऊन त्या शहराप्रमाणे आपल्या नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास व उद्देश आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपले घर, परिसर, कॉलनी व प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवल्यास हे उद्दिष्ट गाठणे सहज शक्य होईल. यापुढील काळात जे रस्त्यवर कचरा टाकतील त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी करून येणाऱ्या काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका (Elections) व या स्वच्छता अभियानाचा काही एक संबध नाही, असेही आ. जगताप (Sangram Jagtap) यांनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!

शक्कर चौक ते कोठला या भागात विशेष स्वच्छता मोहीम

अहिल्यानगर शहराच्या डीप क्लीन स्वच्छता मोहिमेसाठी आ. संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत आग्रही भूमिका घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत सोमवारी सकाळ पासून शक्कर चौक ते कोठला या भागात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यासाठी आ.जगताप सकळी ७ वाजल्यापासून उपस्थित होत मनपाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना व आदेश दिले. यावेळी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व परिसरातील माजी नगरसेवक, समाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्यासह मनापाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

रोड परिसर स्वच्छ झाल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान (Sangram Jagtap)

यावेळी सक्कर चौकातील रस्त्यामधील दुभाजकांच्या कडेला व खालील माती व कचरा साफ करण्यात आला. तसेच बंद गटारीचे चेंबर उघडून त्यातील गाळ, माती, मोठे दगडं काढून स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे, गावात काढून अतिक्रमणे व टपऱ्याही काढण्यात आल्या. या विशेष अभियानामुळे शक्कर चौक ते कोठला रोड परिसर स्वच्छ व चकाचक झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले. 

यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी आवाहन केले की, ज्या नागरिकांचे रस्त्यावर अतिक्रमणे आहेत ते त्यांनी स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा महापालिका त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवरही कठोर कारवाई करणार आहोत. शहराच्या स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा व प्रकाश भागानगरे, कमलेश भंडारी, गोरख पडोळे, उपायुक्त संतोष इंगळे, प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी आदींसह नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.