Sanjay Raut : नितीश कुमारांचं मानसिक संतुलन बिघडलंय – संजय राऊत

Sanjay Raut : नितीश कुमारांचं मानसिक संतुलन बिघडलंय - संजय राऊत

0

Sanjay Raut : नगर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता त्यांचे 75 टक्के मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ज्यावेळेला त्यांचे संतुलन व्यवस्थित होईल, त्यावेळेला ते पुन्हा आमच्यामध्ये येतील, असा खोचक टोला शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

हे देखील वाचा: साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा (Sanjay Raut)

नगर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगरचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, माजी आमदार विजय औटी, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, अशोक गायकवाड, योगीराज गाडे आदी यावेळी उपस्थित होते.

Sanjay Raut

नक्की वाचा: कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

राज्याप्रमाणेच नगरमध्येही गुंडगिरी वाढली (Sanjay Raut)

खासदार संजय राऊत म्हणाले, राज्याप्रमाणेच नगरमध्येही गुंडगिरी वाढली आहे. नगर शहरामधील आमदार देवस्थानच्या, शैक्षणिक संस्थांच्या जमीन बळकावतात. एकीकडे रामाचे नाव घ्यायचे व दुसरीकडे देवस्थानच्या जमिनी बळकवायच्या ही कसली तुमची नीती. नगर शहरातील सुरू असलेली गुंडगिरी, ताबामारी ही आता शिवसेना कदापिही होऊ देणार नाही. लवकरच या संदर्भामध्ये नगरमध्ये मोर्चा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काही इंडिया आघाडी बाहेर गेलेल्या नाहीत. पंजाबमध्ये थोडीफार वेगळी परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस व आप हे एकत्र येत आहेत. लवकर त्याची घोषणा होईल. सर्वजण भाजपच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. निश्चित त्या त्या राज्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here