Sant Dnyaneshwaranchi Muktai:‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

Sant Dnyaneshwaranchi Muktai : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत.

0
Sant Dnyaneshwaranchi Muktai
Sant Dnyaneshwaranchi Muktai

नगर : संत ज्ञानेश्वरांची बहीण म्हणून मुक्ताबाई (Muktabai) सर्वांना परिचित आहे. याच मुक्ताईवर आधारित दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) चित्रपट बनवत आहेत. त्यांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण (Shooting Complete) झाले आहे. या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत.

नक्की वाचा : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा नवा टीझर आऊट; एकदा पहाच !  

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटात ‘मुक्ताई’ कोण ? (Sant Dnyaneshwaranchi Muktai)

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात ‘मुक्ताई’ची आणि संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोण साकारणार ? याविषयी उत्सुकता असून चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देताना सांगितले की, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच दैवी होता आणि विलक्षण आंतरिक शांती प्रदान करणारा होता. आमच्या संपूर्ण टीमने या चित्रीकरणाच्या दरम्यान अतीव मानसिक समाधान मिळाल्याचे वेळोवेळी सांगितले आहे.

अवश्य वाचा : ‘बडे मिया छोटे मिया’चा जबरदस्त टीझर आऊट ; अक्षय व टायगर अ‍ॅक्शनमोडमध्ये  

संत मुक्ताईचे जीवन रुपेरी पडद्यावर (Sant Dnyaneshwaranchi Muktai)

संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटात ‘मुक्ताई’ यांचे बालपण आणि त्यांचा अध्यात्माचा प्रवास दाखविला जाणार आहे. ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. ए.ए.फिल्म्स प्रस्तुत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही पहा : प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवरायांचा चित्ररथ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here