Sant Nivruttinath Maharaj : हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ धाकट्या पंढरीत दाखल

Sant Nivruttinath Maharaj : हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ धाकट्या पंढरीत दाखल

0

Sant Nivruttinath Maharaj : कर्जत: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) पालखी रथाचे धाकटी पंढरी कर्जत शहरात (Karjat City) मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पालखी रथाचे प्रमुख मोहन महाराज बेलापुरकर यांच्यासह सेवेकरी, मानकरी – पुजेकरी यांचा सन्मान कर्जतचे ग्रामदैवत श्री संत शिरोमणी सदगुरु गोदड महाराज (Sant Godad Maharaj) यात्रा कमिटी, तालुका प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. 

नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

जय हरीच्या जयघोषणेने वातावरण भक्तिमय

ज्ञानोबा- माऊली- तुकाराम आणि जय हरीच्या जयघोषणेने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. शहरात ठिकठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाचे दर्शन भाविक घेत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पालखी रथाची दोरी आपल्या हाती घेतली. तर वारकरी बांधवासोबत फुगडी देखील खेळली. यासह खासदार निलेश लंके हे देखील वारकऱ्यांत दंग झाले होते. 

Sant Nivruttinath Maharaj : हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ धाकट्या पंढरीत दाखल
Sant Nivruttinath Maharaj : हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ धाकट्या पंढरीत दाखल

अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई

पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित (Sant Nivruttinath Maharaj)

गुरुवारी (ता.२६) सकाळी श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे मांदळी (ता.कर्जत) येथे प्रवेश केला. याप्रसंगी तालुका प्रशासनाच्यावतीने पालखी प्रमुख यासह सेवेकरी, मानकरी आणि पुजारी यांचे स्वागत करण्यात आले होते. संध्याकाळी पालखी मिरजगाव मुक्कामी होती. तर शुक्रवारी सकाळी निवृत्तीनाथ दिंडी पालखी सोहळा कर्जतच्या दिशेने रवाना झाला. या प्रसंगी ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावात स्वागत करण्यात आले. संध्याकाळी ५:३० च्या सुमारास धाकटी पंढरी कर्जत शहरात आगमन झाले. दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे प्रमुख मोहन महाराज बेलापुरकर यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे पालखीचे सेवेकरी, मानकरी आणि पुजेकरी यांचा सन्मान कर्जत शहराच्यावतीने करण्यात आला. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, खासदार निलेश लंके यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. 

Sant Nivruttinath Maharaj : हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ धाकट्या पंढरीत दाखल
Sant Nivruttinath Maharaj : हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ धाकट्या पंढरीत दाखल

पालखी रथ आणि सोबत असणाऱ्या सर्व दिंडीतील वारकरी-भाविकांचे फटाक्यांची आतिषबाजी, आकर्षक रांगोळी, फुलांची उधळण तसेच शालेय मुलांच्या झांज पथकाच्या तालात पालखी शहरात दाखल झाली. शहरातील चौकाचौकात पालखीचे दर्शन भाविक घेताना दिसत होते. पालखीतील शिस्तबद्ध वारकरी डोक्यावर तुळस, हातात टाळ, वीणा घेत ज्ञानोबा- माऊली- तुकाराम अशा भक्तीभावात वारकऱ्यांसह मुस्लिम भाविक देखील रंगून गेले होते. 

पालखी मुक्काम असणाऱ्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील प्रांगणात पालखी पोहचली असता याठिकाणी आरती करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनाच्यावतीने जेवणाची पंगत, चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमनाने कर्जत शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. जयहरीच्या घोषणेने शहर भक्तिमय रसात न्हाऊन निघाले. या काळात पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था राखत वाहतुकीचे नियंत्रण करीत वारकरी-भाविकांना पालखीस्थळी पोहच करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. तर वारकऱ्याची आरोग्य सेवा राखण्यात विविध ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. यासह कर्जत नगरपंचायतीच्यावतीने पालखी मुक्काम ठिकाणी तसेच वारकऱ्यांची निवास ठिकाणी फिरते शौचालय, पाण्याची तजवीज करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here