School : संगमनेर : ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्यांवरील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण नुकतेच समनापूर परिसरात केंद्रप्रमुख आशा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद (ZP) प्राथमिक शाळा (School) समनापूर शाळेतील शिक्षकांनी केले. या सर्वेक्षणादरम्यान ६ ते १४ वयोगटातील २६ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.
हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक
विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम (School)
या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापूर (मराठी) येथे शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून घेण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमप्रसंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र भालारे, दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख आशा घुले, नंदा वलवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खेमनर, मुख्याध्यापिका राजश्री कर्पे, एकनाथ साबळे, सुनील झावरे आदींसह पालकवर्ग उपस्थित होता.
नक्की वाचा: दुसऱ्या कसोटीत भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा ;बुमराह-अश्विनचा भेदक मारा
कामानिमित्त स्थलांतर केल्याने मुलं शिक्षणापासून वंचित (School)
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते एक वही व पेन तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुलांचे चेहरे खुललेले दिसून आले. कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे काही कुटुंबे वेगवेगळ्या कामानिमित्त स्थलांतर करतात. यावेळी मुलं -बाळही आपल्यासोबतच आणत असतात. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना नजीकच्या शाळेत दाखल करण्याचे आवाहन ऊसतोडणी कामगारांना यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गटशिक्षणाधिकारी गुंड यांनी केले. विस्तार अधिकारी त्रिभुवन व केंद्रप्रमुख घुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शाळाबाह्य सर्वेक्षण व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वैभव जोशी, नामदेव वाडेकर, सुनिता जोंधळे, किरण खैरनार, आफ्रिन बानो शेख, मतीन शेख, मनीषा शिंदे, योगिता गोफणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कर्पे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज कवडे यांनी केले. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.