Sharad Pawar : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; शरद पवारांची सडकून टीका

Sharad Pawar : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; शरद पवारांची सडकून टीका

0
Sharad Pawar : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; शरद पवारांची सडकून टीका
Sharad Pawar : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; शरद पवारांची सडकून टीका

Sharad Pawar : नगर : राज्य सरकारने इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण केली पाहिजे. सरकारने आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले. मात्र, मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात सरकार केवळ तारीख पे तारीख करीत आहे. त्यामुळे सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.  

नक्की वाचा : ‘मी स्वतः त्यांचा वध करणार’; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर सुरू आहे. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित हाेते. शरद पवार म्हणाले, ” मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाची त्या-त्या समाजातील घटकांना गरज आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्राकांत पाटील म्हणाले आरक्षणासाठी एक वर्षाची वाट पाहवी लागेल, असे म्हणून वेळकाढूपणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दुसरीकडे बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकार आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणाले, परंतु, सरकारने आजमितीस काेणतेही पावले उचलली नाही. याशिवाय मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. आज भाजपच्या हातात सत्ता आहे. ईडी, सीबीआय आदी यंत्रणांचा वापर केवळ विराेधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपकडून यंदा आगामी लाेकसभा निवडणुकीत ४१५ जागा निवडून आणण्याचा नारा दिला जाताे. मात्र, आज तेलगंणा, आंध्र, दिल्ली, पंजाब आदी राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही. ज्या ठिकाणी भाजप आहे. तेथे आमदार फाेडून सत्तेवर आले आहे. भाजपला देशात अनुकूल वातावरण नाही. भाजपने लाेकांची फसवणूक केली. हे लाेकांच्या लक्षात आले आहे. 

हे देखील वाचा : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ


भाजपने आजवर केवळ घाेषणांचा पाऊस पाडला आहे. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. २०२२ मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, परंतु, अजूनही कशाचाही पत्ता नाही. माेदींची गॅरंटी खरी नाही. देशाची नवीन पिढी अस्वस्थ आहे. आज देशात २५ वर्षाखालील तरुण बेकार आहे. महागाईचा प्रश्न गंभीर आहे. अन्नधान्याचे भाव गगनाले भिडले आहे. आजची स्थिती सामान्यांना न परवडणारी आहे. सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली. एका बाजूला किंमत देत नाही, दुसरीकडे शेतकऱ्यांची किंमत करायची नाही. शेतकरी आत्महत्येची संख्या कमालीची वाढली आहे. दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारमधील सहकाऱ्यांना अटक केली. आता त्यांना अटक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. विराेधकांची एकी करून माेदी सरकार बदलणे हाच पर्याय आहे. येत्या पंधरा दिवसांत इंडिया आघाडीची बैठक हाेईल. त्यात आगामी निवडणुकांसाठी कसे सामाेरे जायचे, या संदर्भात विचारमंथन हाेईल. माेदींना सत्तेवरुन हटवणे, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत सामावून घेणे, हाच आमचा उद्देश आहे. आपण सहकाऱ्यांसाेबत निवडणुकीला सामाेरे जायचे आहे. सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा, असेही आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here