Sharad Pawar : नगर : महसूलमंत्री विखे यांनी एका उद्योजकाला माझ्याकडे मध्यस्थीसाठी पाठवले होते. लंके सोडून दुसऱ्याला उमेदवारी द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, मी त्यांचे ऐकले नाही. लंकेंना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नीलेश लंकेंमुळे (Nilesh Lanke) विखेंची झोप उडाली आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार (NCP- Sharadchandra Pawar) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.
हे देखील वाचा: माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय?; सुजय विखेंचा विरोधकांवर घणाघात
स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप
नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप झाला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, ‘‘विखे पिता-पुत्रांना आत्मविश्वास नाही. त्यांनी आजवर अनेक पक्ष बदलले आहे. लंके यांच्याकडे संपत्ती नाही, परंतु, माणुसकी आणि लोकप्रेमाचा खजिना आहे.’’
नक्की वाचा: शिर्डी लाेकसभेसाठी बड्या नेत्याचा अर्ज; दिग्गजांची उपस्थिती
ठाकरे व थोरातांचीही टीका (Sharad Pawar)
थोरात यांनीही विखेंवर टीका करताना ही निवडणूक विखे व लंके यांच्यात आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री हे शरद पवार व माझ्यावर टीका करत आहे. लक्ष विचलित करण्यासाठी पालकमंत्री हे आमच्या दाेघांवर टीका करत आहे. परंतु, आम्हीही त्यांना पुरुन उरणार आहे. आदित्य ठाकरे यांनीही, लंके यांना आमचे शिवसैनिक अनिलभैय्यांची कमी पडू देणार नाहीत, अशी ग्वाही दिली. लंके म्हणाले,‘‘ नगरमध्ये व्यापारी घाबरलेत, पण हा लंके तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. २४ तास तो तुम्हाला साथ देईल. तुमची दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न करतो आहे, मला एकदा संधी द्या, रात्रंदिवस तुमच्या सेवेत राहील.’’