नगर : संपूर्ण देशात खळबळ माजविणाऱ्या घटनेंपैकी एक असलेली घटना म्हणजे शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora massacre). पोलिसांना सुद्धा या घटनेने कोड्यात पाडलं होतं. आता शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्रानी मुखर्जीवर (Indrani Mukharjee) आधारित एका माहितीपटाच्या सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.
नक्की वाचा : मुनव्वर फारुकी झाला ‘बिग बॉस १७’चा विजेता
‘द इंद्रानी मुखर्जी स्टोरी – बरीड ट्रुथ’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार (Sheena Bora massacre)
‘द इंद्रानी मुखर्जी स्टोरी – बरीड ट्रुथ’ असे त्या मालिकेचे नाव असून ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यावेळी नेटफ्लिक्सकडून त्या डॉक्युसीरिजची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या २३ तारखेला ही मालिका प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंद्रानी मुखर्जी ही शीना बोरा हत्याकांडातील काही गोष्टींवर सडेतोडपणे भाष्य करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अवश्य वाचा : राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
द इंद्रानी मुखर्जी स्टोरी – बरीड ट्रुथ’ या सीरिजचे पोस्टर व्हायरल (Sheena Bora massacre )
द इंद्रानी मुखर्जी स्टोरी – बरीड ट्रुथ’ या सीरिजचे सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झाले आहे. त्यात इंद्रानीचा चेहरा दिसतो आहे. २०१२ मध्ये घडलेल्या त्या हत्याकांडानं मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर इंद्राणी ही चर्चेत आली होती. पुढे बरीच वर्षे तिला तुरुंगात घालवावी लागली. या सगळ्या घटनेवर तिनं पुस्तकही लिहिलं आहे. शीना बोरा केसमधील प्रमुख आरोपी म्हणून इंद्रानीचं नाव समोर आलं होतं.
हेही पहा : कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू
आता नेटफ्लिक्सनं त्यांच्या इंस्टावरुन आगामी डॉक्युसीरिजची घोषणा केली आहे. ही मालिका २३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ही डॉक्युसीरिज इंद्राणी मुखर्जीच्या २०२३ मध्ये आलेल्या ‘अनब्रोकन – द अनटोल्ड स्टोरी’ नावाच्या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. इंद्राणीनं या घटनेत सहा वर्षांचा तुरुंगवास भोगला असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.