Shri Sant Bhagwan Baba : श्री संत भगवानबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

Shri Sant Bhagwan Baba : श्री संत भगवानबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

0
Shri Sant Bhagwan Baba

Shri Sant Bhagwan Baba : पाथर्डी : देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबा (Shri Sant Bhagwan Baba) यांचा ५९ वा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी (ता.२६) श्री क्षेत्र भगवानगडावर होत आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता श्री संत भगवानबाबांच्या समाधीची महापूजा, दुपारी १२ ते २ या वेळेत गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री (Namdev Maharaj Shastri) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. तरी श्री संत भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व भाविकांनी श्री क्षेत्र भगवानगडावर उपस्थित रहावे, असे आवाहन श्री क्षेत्र भगवानगड (Bhagwangad) ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

ऊसतोड कामगारांचे श्रद्धास्थान (Shri Sant Bhagwan Baba)

हे देखील वाचा: नरभक्षक बिबट्याच्या हल्लात चिमुकला ठार

देशातील अध्यात्मिक क्षेत्रामध्ये नामांकित असलेले श्री क्षेत्र भगवानगड हे ऊसतोड कामगारांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. भगवानगडाचा सत्तर टक्के भक्तवर्ग हा ऊसतोड कामगार आहे. या ऊसतोड कामगारांच्या अपार श्रद्धेमुळे आणि न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे भगवानगड हे देशातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठ, विद्यार्थी वस्तीगृह आणि दररोजचे मोफत अन्नदान ही भगवानगडाची वैशिष्ट्ये आहेत.

वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत (Shri Sant Bhagwan Baba)

नक्की वाचा : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना अटक

राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here