Leopard : नरभक्षक बिबट्याच्या हल्लात चिमुकला ठार

Leopard : नरभक्षक बिबट्याच्या हल्लात चिमुकला ठार

0
Leopard
Leopard

Leopard : संगमनेर : तालुक्यातील आश्वी परिसरातील सादतपूर येथील गोरे वस्तीवर नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard attack) पाच वर्षाचा चिमुकला राहुल गोरे ठार (Killed) झाला. राहत्या घराकडून चुलत्याच्या घराकडे जात असताना रस्त्यालगत गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) हर्षलवर झडप घालून त्याला गिन्नी गवतात ओढून नेले. त्याचा भाऊ आरडाओरड करत घराकडे पळाला. त्यामुळे हर्षलच्या घरचे सर्वजण ओरडत गवताकडे पळाले असता बिबट्याने तेथून धूम ठोकली.

अवश्य वाचा : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना अटक

परिसरात मोठी खळबळ (Leopard)

जखमी हर्षल राहुल गोरे यास उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लोणी येथील घटना ताजी असतानाच दहा दिवसाच्या अंतरावर नरभक्षक बिबट्याने आज सादरपूर मध्ये पुन्हा ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

Leopard

नक्की वाचा : व्यापाऱ्याचे दहा लाख रुपये लंपास करणारा गजाआड

नरभक्षक बिबट्या अजून किती बळी घेणार? (Leopard)


गेल्या दहा दिवसापासून वन विभागाने विविध ठिकाणी १५ पिंजरे लावले आहेत. पण आतापर्यंत या पिंजऱ्यामध्ये प्रवरानगर पाथरी रोडवरील थेटे वस्तीवर एकच बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. वन विभागाच्या माध्यमातून लावलेल्या पिंजऱ्यांना बिबटे हुलकावणी देऊन लहान बालकावर हल्ला करत आहेत. नरभक्षक बिबट्या अजून किती बळी घेणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हे देखील वाचा : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here