Shrirampur News : बेलापूर सेवा संस्थेचा कारभार पारदर्शी – सभापती नवले

बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने ९०० सभासदांना १५% लाभांश तसेच दिवाळी भेट म्हणून १० किलो साखर व मिठाई भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच संस्थेच्या कार्यालयात पार पडला.

0
169

श्रीरामपूर : बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्था (Belapur Miscellaneous Executive Services Institute) ही श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी  संस्था आहे. संचालक मंडळाने पारदर्शी व काटकसरीने कारभार केल्यामुळे याही वर्षी सभासदांना १५ % लांभाश, दहा किलो साखर तसेच मिठाई भेट देणे शक्य झाले असल्याची माहिती श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले (Sudhir Navale) यांनी दिली. 

नक्की पहा : मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने ९०० सभासदांना १५% लाभांश तसेच दिवाळी भेट म्हणून १० किलो साखर व मिठाई भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच संस्थेच्या कार्यालयात पार पडला. त्यावेळी नवले यांनी ही माहीती दिली. 

अवश्य वाचा : सरकारी कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर; जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन शेषराव पवार म्हणाले की, तालुक्यात चांगला,स्वच्छ कारभार असणारी ही संस्था आहे. मात्र  विरोधकांनी सत्तेचा दुरुपयोग करुन संचालक मंडळावर अनेक आरोप केलेत.परंतु संचालक मंडळावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने करण्यात आलेले होते. संस्थेचा कारभार चोख असल्यामुळे सभासदांना लाभांश देता आला असेही पवार म्हणाले. यावेळी माजी सरपंच भरत साळूंके पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले .

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जनता आघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड ,शिवाजी वाबळे, विलास मेहेत्रे ,राजेंद्र सातभाई, विश्वनाथ गवते, पत्रकार अशोक गाडेकर, प्रकाश कुऱ्हे , नंदकिशोर नवले, चंद्रकांत नाईक , ज्ञानदेव वाबळे, त्रिंबक कुऱ्हे, अयाज अली सय्यद, भगवान सोनवणे ,संजय रासकर, पंडीतराव बोंबले ,अशोक राशिनकर, सुहास शेलार ,दिलीप दायमा, प्रसाद खरात, संजय नवले आदींसह सभासद उपस्थित होते.