Snehalaya : बालविवाह जागृती सायकल यात्रेचे स्नेहालय येथून सुरुवात

Snehalaya : बालविवाह जागृती सायकल यात्रेचे स्नेहालय येथून सुरुवात

0
Snehalaya

Snehalaya : नगर : राष्ट्रीय युवा सप्ताह (National Youth Week) निमित्त ‘बालविवाह (child marriage) मुक्त भारत, मानवाधिकारयुक्त भारत’ हा संकल्प घेऊन १६ ते २६ जानेवारी या ११ दिवसाची कालावधीत बालविवाहविरोधात जागृती सायकल यात्रेचे उद्घाटन मंगळवारी(ता. १६) जिल्हाधिकारीसिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते झाले. ही सायकल यात्रा स्नेहालय (Snehalaya) पुनर्वसन संकुल, एम.आय.डी.सी., पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, अकोले, संगमनेर, राहुरी, सोनई, शनी शिंगणापूर, अहमदनगर, स्नेहालय हे तालुके आणि या तालुक्यातील वेगवेगळ्या ५०० पेक्षा जास्त गावातून शाळांना भेटी देत जाणार आहे.

हे देखील वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

Child marriage
Child marriage

बालविवाह बाबत जागृती करणार (Snehalaya)

दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सामाजिक संस्था आणि लग्न लावणारे व्यावसायिक घटकांना भेटून बालविवाह आणि त्या बद्दलचे कायदे याबाबतीत जागृती करणार आहेत. सायकल यात्रेच्या सुरवातीस सहभागी सायकल यात्रींसोबत संवाद करताना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व घटक, प्रशासन विभाग, सामाजिक संस्था आणि लग्न लावणारे व्यवसायिक संघटना यांना एकत्रित करून हा पथदर्शी उपक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन केले. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांच्या सहकाऱ्याची हमी त्यांनी यावेळी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी मुलीचे समाजातील स्थान अबाधित राखण्याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बेटी बचाओ, बेटी पढाओ (मुलीच्या जन्माचे स्वागत करा) अभियानच्या प्रेरणास्थान असलेल्या डॉ. सुधा कांकरिया यांनी स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे व बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश दिला.

नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे

मान्यवरांची उपस्थिती (Snehalaya)

या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बळवंत वारुडकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड.तुषार कवडे, त्याचबरोबर नितीन थाडे, दीपक गुजराती, चंद्रशेखर मुळे, डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहालयाच्या अध्यक्ष जया जोगदंड, राजीव गुजर, डॉ.महेश मुळे, हनीफ शेख, ॲड.बागेश्री जरंडीकर आदी उपस्थित होते. प्रवीण कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी विकास सुतार, नंदा पांडुळे, स्वाती ढवळे, उषा खोल्लम, शाहीद शेख, शशिकांत शिंदे, पूजा झिने यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here