नगर : अभिनेता सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच तो आपल्या गरजुंची मदत करून नेहमी चर्चेत असतो. सोनू सूदला याच परोपकारी कामासाठी उत्कृष्ट मानवतावादी प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ (Champions Of Change) पुरस्कार मिळाला आहे. सोनू सूद कायम सामाजिक कल्याणासाठी करत असलेल्या कामांसाठी ओळखला जातो.
नक्की वाचा : बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून दिलासा; मोबाईल फोन स्वस्त होणार
अभिनेता सोनू सूदची वंचितांना मदत (Sonu Sood)
‘द सूद फाउंडेशन’ या आपल्या धर्मादाय संस्थेद्वारे या अभिनेत्याने वंचितांना शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे. गरिबांना त्यांच्या उद्योगांना चालना देण्यास मदत केली आहे. तसेच त्याने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टवर काम देखील सुरू केले आहे. एक वृद्धाश्रम देखील त्याने उभारला आहे. चॅम्पियन्स ऑफ चेंज’ ही ओळख त्याच्या कामाचा अनोखा पुरावा आहे.
अवश्य वाचा : मनाेज जरांगे पाटलांनी उगारलं पुन्हा आंदाेलनाचं हत्यार; १० फेब्रुवारीपासून उपाेषण
सोनू सूदने नुकताच त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट पूर्ण केला आहे.’फतेह’ हा एक सायबर क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात सूद आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. सोनू सूदची निर्मिती कंपनी, शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजची ही सह-निर्मिती आहे.