SSC Result 2025:दहावीचा निकाल जाहीर;महाराष्ट्रात मुलींनीच मारली बाजी  

0
SSC Result 2025:दहावीचा निकाल जाहीर;महाराष्ट्रात मुलींनीच मारली बाजी  
SSC Result 2025:दहावीचा निकाल जाहीर;महाराष्ट्रात मुलींनीच मारली बाजी  

SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Results) आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा (Kokan) निकाल सर्वाधिक लागला आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं (Online Results) निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

नक्की वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर

दहावीच्या निकालात कोकण अव्वल तर नागपूर तळाला  (SSC Result 2025)

दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे.तर निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९६.१४ अशी आहे, तर मुलांची टक्केवारी ९२. २१ अशी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

अवश्य वाचा : मोठी बातमी!’किंग कोहली’चा कसोटी क्रिकेटला अलविदा

यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. तर २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी पास झाले. तसेच ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी बसले. यातील ८ हजार ८४८ पास झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.२७ टक्के इतका लागला आहे,असे शरद गोसावी यांनी म्हटले. या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

कुठे पाहाल निकाल ? (SSC Result 2025)

https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org