ST : नगर : अपघातांवर नियंत्रण राहून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (ST) सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे. प्रवाशांसाठी तत्पर असणाऱ्या सेवेकरांनो अपघातांवर (Accidents) नियंत्रण ठेवून त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यास प्राधान्य द्यावे. रस्ता व सुरक्षा नियमांचे (Road and Safety Rules) पालन करून अपघातमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
हे देखील वाचा : अयाेध्येतील राम मंदिरासाठी १४ साेन्याचे दरवाजे; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभागाकडून गुरुवार (ता. ११) ते गुरुवार (ता. २५) सुरक्षितता मोहिमेचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तारकपूर आगारात आज सुरक्षितता सप्ताह पार पडला. यावेळी विना अपघात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुरक्षितता मोहिमेत सन्मान करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, पाेलीस निरीक्षक माेरेश्वर पेन्द्राम, प्राध्यापक बाळासाहेब मुंडे, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे, संपादक विठ्ठल लांडगे, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे, अविनाश कलापुरे, वाहतूक निरीक्षक राेहित राेकडे, झाकिर शेख आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या सुरुवात जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाली.
नक्की वाचा : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे
जिल्हाधिकारी म्हणाले, ” ग्रामीण व सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ही एक प्रकारची जीवनवाहिनी आहे. प्रवासी सेवेसाठी ब्रीद घेऊन चालणाऱ्या एसटी अर्थात लालपरीनेच आजही जास्तीत-जास्त लाेक प्रवास करतात. वाहन चालकांनी वाहन चालवताना माेबाईलचा वापर करु नये, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धाेका हाेऊ शकताे. प्रवास करण्याआधीच चालकांने वाहन सुस्थितीत आहे का नाही, याची खात्री करून घ्यावी. रस्त्याने ज्या ठिकाणी प्रवासी एसटीला हात करुन थांबवण्याची विनंती करतात. त्याठिकाणी एसटी थांबवली पाहिजे. त्यामुळे एसटीवरील प्रवाशांचा विश्वास अधिक वाढण्यात मदत हाेते. नगर जिल्ह्यातील एसटी चालकांचे अपघाताचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे वाहतूक सप्ताहनिमित्ताने यापुढे एकही अपघात हाेणार नाही, असा संकल्प करून जिल्हा अपघातमुक्त अशी ओळख निर्माण करा,” असे आवाहनही त्यांनी केले.
उर्मिला पवार म्हणाल्या, ”गाव तेथे एसटीची सेवा आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी अपघात हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. याशिवाय नागरिकांनीही वाहतुकीचे नियमांची काटेकाेर अंमलबजावणी करावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये.” माेरेश्वर पेन्द्राम म्हणाले, ”रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी हाेऊ शकते. बहुतांश वेळा बरेचशे वाहन चालक हे रात्रीच्या वेळी दारुच्या नशेत वाहन चालवत असतात. त्यामुळे नाहक अपघाताला निमंत्रण मिळते. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवाताना काेणतेही व्यसन करू नये, सुरक्षितता म्हणजे गतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चालकानेही जबाबदारीचे भान ठेवून काम करावे” असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप औटे तर आभार अभिजीत चाैधरी यांनी मानले.
सुरक्षित सेवेचे सन्मानार्थी
चालक-शिवाजी सराटे, पाटीलबा एकशिंगे. कैलास सांगळे, अन्सार शेख, पाेपट सुरसे, राजेंद्र त्रिमुखे, दीपक सकुंडे. गुणवंत कामगार- संजय शहाणे, फिराेज शेख, याेगेश झिंजुर्डे, प्रवीण कराळे, सिद्धेश्वर ताेडकर, रेणुका सातपुते.