Student : श्रीरामपूर : येथील नगरपालिका प्रशासनाने गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या (MPSC/UPSC) अभ्यासासाठी सुरू केलेल्या अभ्यासिकेचे शुल्क अचानक वाढविले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी (Student) पुरे यांना नगर पालिकेसमोरच घेराव घातला. याचवेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Anuradha Adik) याही तेथे आल्या. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना भेटून शुल्क कमी करण्याची मागणी आपण करू, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
नक्की वाचा: तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप
अचानक या शुल्कामध्ये तब्बल दहापट वाढ
दिवंगत जंयत ससाणे यांच्या पुढाकारातून शहरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी नगरपालिकेच्या वतीने अभ्यसिका सुरू करण्यात आली. पालिका प्रशासनाकडून नाममात्र शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पुस्तके, वीज, पाणी या सुविधांसह अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा ठरावही तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी मंजूर केला. त्यानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून सहा महिन्यांकरिता ६० रूपये शुल्क आकारले जात होते. मात्र, आता अचानक या शुल्कामध्ये तब्बल दहापट वाढ केली. आता ६० ऐवजी ६०० रूपये भरावे लागणार असल्याने विद्यार्थी हवालदिल झाले. काल सायंकाळी अभ्यासासाठी विद्यार्थी अभ्यासिकेत गेले असता पुरे यांनी शुल्क भरल्याशिवाय बसता येणार नसल्याचे सांगितले.
हे देखील वाचा: श्रीरामपुरात ‘विरा विरा जय महावीरा’चा जयघोष
सुमित मुथ्था व पुरे यांच्यात शाब्दिक चकमक (Student)
सर्वांनी विनंती केली. मात्र, विद्यार्थ्यांची विनंती पुरे यांनी मान्य केली नाही. त्यामुळे संतप्त झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने पालिकेत मुख्याधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडण्यासाठी गेले. मात्र, मुख्याधिकारी यांची भेट होऊ शकली नाही. खाली आल्यानंतर सर्वांनी पुरे यांना घेराव घातला. पुरे यांनी त्यांच्या भावना समजावून घेतल्या. मात्र, पुस्तकांच्या किंमती प्रचंड वाढल्याने आता पालिका प्रशासनास अल्प दर शक्य नाही, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्या कारणाने विद्यार्थी आणखी संतप्त झाले.
यावरून सामाजिक कार्यकर्ते सुमित मुथ्था व पुरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.