Sujay Vikhe : सुजय विखे २९ काेटींचे धनी

Sujay Vikhe : सुजय विखे २९ काेटींचे धनी

0
Sujay Vikhe
Sujay Vikhe : सुजय विखे २९ काेटींचे धनी

Sujay Vikhe : नगर : नगर लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातून सोमवारी (ता. २२) डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत शपथपत्रात दिलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा (Property) तपशील सविस्तरपणे नमूद करीत सुजय विखे यांनी पत्नी धनश्री विखे आणि दोन मुले यांच्या नावे एकत्रित २९ कोटी १८ लाख ८८ हजार ९९९ रुपये इतकी संपत्ती असल्याचे नमूद केले आहे.

नक्की वाचा: तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल (Sujay Vikhe)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सकाळी तीन स्वतंत्र उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दाखल केले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल उमेदवारांना उमेदवारी अर्ज सोबत संपत्ती आणि गुन्ह्यांच्या संदर्भात शपथपत्रावर माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानुसार उमेदवारी अर्जासोबत सुजय विखे पाटील यांनी विहित नमुन्यात शपथपत्र सादर केले.

Sujay Vikhe
Sujay Vikhe : सुजय विखे २९ काेटींचे धनी

हे देखील वाचा: श्रीरामपुरात ‘विरा विरा जय महावीरा’चा जयघोष

संपत्तीचे विवरण (Sujay Vikhe)

या शपथपत्रानुसार डॉ. सुजय विखे यांच्या नावे १२ कोटी १५ लाख ६९ हजार ५८५ रुपयाची स्थावर मालमत्ता आहे. तसेच दहा कोटी ९५ लाख ७० हजार ८९३ रुपयाची जंगम मालमत्ता आहे. सुजय विखे पाटील यांच्या नावे नमूद करण्यात आलेल्या स्थावर आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचे मूल्य २३ कोटी ११ लाख ४० हजार ४७८ इतके नमूद करण्यात आले आहे. याच शपथपत्रात सुजय विखे यांनी त्यांच्या पत्नी धनश्री सुजय विखे पाटील यांच्या नावे तीन कोटी ८८ लाख ३२ हजार ८२३ रुपयांची जंगम आणि एक कोटी १९ लाख ८९ हजार ४४० रुपयांची स्थावर अशी एकूण ५ कोटी आठ लाख २१ हजार २६३ मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. याच शपथपत्रात सुजय विखे यांनी आपल्यावर अवलंबित असलेल्या दोन मुलांच्या नावे एकूण ९९ लाख २६ हजार २९८ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. तसेच वैयक्तिक स्वतःच्या नावे ३ कोटी ६४ लाख १३ हजार २०९ रुपयाचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. या शपथपत्रात विखे यांनी त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ३५ लाख ३३ हजार ५१३ असल्याचे शपथपत्रात विखे यांनी नमूद केले आहे. तर पत्नीकडे असलेल्या दागिन्यांची किंमत ४५ लाख १० हजार १०१ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Sujay vikhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here