IPl 2024 RR vs MI: यशस्वीची ‘यशस्वी’खेळी; शतक ठोकत मुंबईला नमवलं

आयपीएल २०२४ च्या मोसमात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला आहे. प्रथम खेळताना मुंबईने २० षटकांत १७९ धावा केल्या होत्या.

0
IPl 2024 RR vs MI
IPl 2024 RR vs MI

नगर : आयपीएल २०२४ च्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ९ गडी राखून पराभव केला आहे. प्रथम खेळताना मुंबईने २० षटकांत १७९ धावा केल्या होत्या. मुंबईकडून तिलक वर्मा आणि निहाल वढेरा यांनी शानदार खेळी केली. राजस्थान संघाची ही सुरुवात चांगली झाली. कारण जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी पॉवरप्ले षटकांतच संघाची धावसंख्या ६० च्या पुढे नेली.

नक्की वाचा : सुजय विखे २९ काेटींचे धनी

यशस्वी जयस्वालने झळकावले मुंबईविरूद्धचं दुसरे शतक (IPl 2024 RR vs MI)

जॉस बटलरने २५ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली, पण जैस्वालने सर्वांनाच प्रभावित केले. आयपीएल २०२४ मध्ये जयस्वालने प्रथमच ५० धावांचा टप्पा ओलांडला. ज्याचे त्याने शतकात रूपांतर केले. जयस्वालने ६० चेंडूत १०४ धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने ९ चौकार आणि ७ षटकार मारले. पहिल्या १० षटकात राजस्थान रॉयल्सने १ गडी गमावून ९५ धावा केल्या होत्या. पुढच्या ५ षटकांत संघाच्या ५६ धावा झाल्या होत्या.

राजस्थानला विजयासाठी १८ चेंडूत फक्त १० धावा करायच्या असल्याने सामना एकतर्फी झाला होता. संजू सॅमसनने ही २७ चेंडूत ३८ धावांची खेळी करत राजस्थानच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेवटी जयस्वालने चौकार मारत विजयी फटकेबाजी करत राजस्थानचा ९ विकेट्स राखून विजय निश्चित केला. राजस्थानच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. २०२३ मध्ये यशस्वीने मुंबईविरूद्धचं पहिले शतक झळकावले होते आणि यंदाही मुंबईविरूद्धचं आपले दुसरे शतक त्याने झळकावले.

अवश्य वाचा : तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप

मुंबईचा खेळ पुन्हा फसला  (IPl 2024 RR vs MI)

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला नाही. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ९ बाद १८९ धावा केल्या. रोहित शर्मा पहिल्या षटकात एक चौकार मारत बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला तर दुसऱ्या षटकात इशान किशन खाते न उघडता बाद झाला. तर सूर्यकुमार यादवही १० धावा करत स्वस्तात बाद झाला. यानंतर आलेला मोहम्मद नबीने एका षटकात १७ धावा करत मुंबईला पॉवरप्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारून दिली.

 मुंबईच्या दोन युवा फलंदाज तिलक वर्मा आणि नेहल वधेराने ९९ धावांची शानदार भागीदारी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आणि ४५ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारासह ६५ धावा केल्या. तर नेहलने २४ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ४९ धावा केल्या. यानंतर तिलकने विकेट गमावताच मुंबईने झटपट ३ विकेट्स गमावल्या. ज्यामुळे अखेरच्या षटकात मुंबईला ३ धावाच करता आल्या. तर बोल्टने २ विकेट आणि आवेश, चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. या विकेटसह चहलने आयपीएलमध्ये आपले २०० विकेट्स पूर्ण केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here