Sujay Vikhe : विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे : सुजय विखे 

Sujay Vikhe : विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे : सुजय विखे 

0
Sujay Vikhe
Sujay Vikhe : विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे : सुजय विखे 

Sujay Vikhe : नगर : सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे होय. या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. यामुळे मोदी यांची विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे, असे प्रतिपादन महायुतीचे (Mahayuti) उमेदवार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी केले. 

हे देखील वाचा: सुजय विखे २९ काेटींचे धनी

भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन (Sujay Vikhe)

सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभांना सुरवात केली. ते भारजवाडीतील प्रचार सभेत बोलत होते. नगर लोकसभेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर प्रचार सुरू केला आहे. यावेळी आमदार मोनिका राजळे,  माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्युजंय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, माणिकराव बटोळे आदी उपस्थित होते.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

नक्की वाचा: तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप

सुजय विखे म्हणाले (Sujay Vikhe)

”पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविला आहे. गरीब कल्याण योजनेच्या माध्यामातून ८० कोटी हून अधिक परिवार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ५० कोटीहून अधिक लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे. ३४ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यामातून आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. ४ कोटीहून अधिक लोकांचे पीएम आवास योजनेच्या माध्यामातून पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तर १४ कोटीहून अधिक लोकांना जलजीवन मिशनच्या रुपाने शुद्ध पाणी मिळाले आहे. मागील १० वर्षात २५ कोटीहून अधिक लोक गरिबीतून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे सामान्य माणसाचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. देशात मोदींची हमी बोलत आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असून महायुतीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडूण येणार यात आता कोणतीही शंका उरली नसल्याचे त्यांनी सांगितले.”

Sujay Vikhe
Sujay Vikhe : सुजय विखे २९ काेटींचे धनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here