Voting : तापमानाचा पारा वाढला; प्रशासनासमाेर मतदानाच्या टक्केवारीची चिंता

Voting : तापमानाचा पारा वाढला; प्रशासनासमाेर मतदानाच्या टक्केवारीची चिंता

0
Voting
Voting : तापमानाचा पारा वाढला; प्रशासनासमाेर मतदानाच्या टक्केवारीची चिंता

Voting : नगर : लाेकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंश जवळ गेल्याने १३ मे च्या आसपासही तापमान (Temperature) असेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदान (Voting) घडवून आणण्याचे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. 

हे देखील वाचा: सुजय विखे २९ काेटींचे धनी

उन्हाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम

आत्तापर्यंत उन्हाळ्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांच्या आतच असल्याची दिसते आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानच्या आकडेवारीनुसार मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. १३ मे रोजी नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. वैशाख महिना म्हणजे तापमानाच्या दृष्टीने कडक असतो. तापमान चाळीशी पार असेल, तर त्याचा किती परिणाम होतो की नाही, हे पाहावे लागणार आहे.

नक्की वाचा: तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप

सर्वांना मतदानाचे आवाहन (Voting)

दरम्यान, उन्हाचा पारा वाढल्याने लाेक दुपारी १२ ते ४ घराबाहेर न पडणे पसंत करतात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याने प्रशासनाने प्रत्येक बुथवर नागरिकांसाठी पाणी, कुलर, दिव्यागांसाठी व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध केल्या आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here