Sujay Vikhe : नगर : देशात सध्या मोदींची हमी सुरू आहे. देशातील जनतेचा त्यावर विश्वास आहे. ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र माेदी (Narendra Modi) आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी केले.
नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी
विरोधकांवर सडकून टीका
राहुरी तालुक्यातील सोनगाव चौकातील कॉर्नर मिटिंगमध्ये बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा सडकून समाचार घेत विरोधकांकडे नेता म्हणून कोणताही चेहरा नाही. त्यांच्याकडे ‘एक ना धड बारा भानगडी आहेत’. ते फक्त देशाला फक्त खड्ड्यातच घालू शकतात. यामुळे पंतप्रधान नरेंद्र हे देशाला एकमेव पर्याय आहेत,” असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान
सुजय विखे म्हणाले (Sujay Vikhe)
”निवडणूक ही देशाची प्रतिनिधित्व ठरवणारी निवडणूक आहे. येणाऱ्या काळात देश कुणाच्या हाती द्यायचा आहे, हे जनतेला ठरवायचे आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके प्रभावी नेतृत्व दुसरे काेणतेही नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मागील १० वर्षात जी प्रगती केली, हे जगासमोर मोठे उदारण आहे. देशात संविधान मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकशाही अधिक सुदृढ आणि लोखाभिमुख करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाला विकासासाच्या माध्यमातून जगात महासत्ता म्हणून पुढे आणायचे आहे.”