Unseasonal Rain : अवकाळी पावसाने आदिवासी भागात घरांचे मोठे नुकसान

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने आदिवासी भागात घरांचे मोठे नुकसान

0
Unseasonal Rain
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने आदिवासी भागात घरांचे मोठे नुकसान

Unseasonal Rain : अकोले : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व वादळी वार्‍याने अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कोहंडी परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची माहिती समजताच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य व अगस्ति कारखान्याच्या (Agasti Sahakari Sakhar Karkhana) उपाध्यक्षा सुनीता भांगरे (Sunita Bhangre) यांनी नुससानग्रस्त (Distressed) परिसराला भेट देऊन पाहणी केली.

नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी

मुलांना वाचविण्यासाठी स्वतः जखमी (Unseasonal Rain)

या अवकाळी पावसात रामू चिंधू परते व शीला रामू परते यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले. छप्पर उडून गेले, अन्नधान्य भिजून गेले. तसेच घरातील जीवनापयोगी वस्तू देखील खराब झाल्याने अत्यंत वाईट अवस्थेत सदर कुटुंब राहत होते. शीला यांनी आपल्या मुलांच्या अंगावर काही पडू नये म्हणून दोघांनाही पोटाला धरून त्यावर आडव्या राहिल्या. सुदैवाने सिमेंट पत्रे कोसळून देखील त्या मातेने ते आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर त्यांचा मार घेतला आणि आपल्या दोन्ही मुलांना वाचवले. त्याही जखमी झाल्या असून स्थानिक कार्यकर्ते रामदास परते यांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून दोन्ही मुले घाबरली असल्याचे सांगताना सुनीता भांगरे आणि उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान

कुटुंबासाठी तातडीची आर्थिक मदत (Unseasonal Rain)

सदर भेटीमध्ये हे दृश्य व विदीर्ण अवस्था पाहून संवेदनशील असलेल्या सुनीता भांगरे यांनी सदर कुटुंबासाठी तातडीची आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये रोख स्वरूपात दिले आणि कुटुंबाला आधार दिला. तसेच तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे आणि प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांना तत्काळ फोन करून तातडीची मदत तसेच पुनर्वसनासाठी घरकुल बांधून देण्याची विनंती केली. याप्रसंगी सरपंच पांडू तातळे, रामदास परते, गोरख परते, नंदू परते, पोलीस पाटील परते, संतोष मुतडक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here