Vicky kaushal: ‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलचा लूक आला समोर 

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे सध्या शुटिंग सुरु असून चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

0
Vicky kaushal
Vicky kaushal

नगर : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल हा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. विकीने उरी, सॅम बहादूर अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.आता विकी कौशलचा छावा'(Chhava) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे सध्या शुटिंग सुरु असून चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे चित्रपटातील विकी कौशलचा लूकचा सर्वांसमोर आला आहे.

नक्की वाचा : मोहन भागवत यांनी केले ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे कौतुक

बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट (Vicky kaushal)

बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर नवीन चित्रपट बनवण्यात येत आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. विकी कौशलने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. सोहळा मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत विकी कौशलने संभाजी महारांजासारखा पोषाख परिधान केला आहे. विकीने कपाळाला गंध, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कवड्याची माळ, कमरेला शेला, लेहंगा असा लूक केला आहे. सोशल मीडियावर या फोटोची खूप चर्चा होत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विकीचा हा नवीन चित्रपट पाहण्यासाठी आतुर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अवश्य वाचा : ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी

कधी येणार चित्रपट ? (Vicky kaushal)

‘छावा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना खूप जास्त उत्सुकता आहे. चित्रपटाबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. छावा या चित्रपटात रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच आशिष पालांडे, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here