Sujay Vikhe : नगर : नगरमधील व्यापाऱ्यांसाठी महायुतीच्या (Mahayuti) सरकारतर्फे विविध सेवा सुविधा निर्माण करणार आहे, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार (Candidate) डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी दिले.
हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान
कॉर्नर मिटिंग आणि गाठी भेटींवर भर (Sujay Vikhe)
नेप्ती बाजारपेठेतील मधील कांदा मार्केटमध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा, कॉर्नर मिटिंग आणि गाठी भेटी देण्यावर भर दिला आहे. याच निमित्ताने ते आज नगर शहरातील कांदा मार्केटमध्ये व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी त्याच्यासोबत आमदार संग्राम जगताप, उद्योगपती सचिन कोतकर, अविनाश घुले, निखील वारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी
विखे म्हणाले (Sujay Vikhe)
”महायुती सरकार हे व्यापाऱ्याच्या जोडीला आहे. व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक मूलभूत सेवा सुविधांवर सरकारतर्फे भर दिला जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपुर लाभ व्यापाऱ्यांना मिळण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जातील. तसेच नारायणडोह येथील नवीन रेल्वे स्थानकात कांदा व्यापाऱ्यांसाठी रल्वे धक्का निर्माण केला जाईल. त्यामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांना भारतभर कांद्याचा व्यापार करता येईल. विळद येथील नवीन एमआयडीसीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कांद्यावर प्रकिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभारणी केली जाईल. चिचोंडी पाटील येथे जनावरांचा बाजार उभा करून पशु व्यवसायाला चालना देण्याचे काम केले जाईल. त्याच कांद्याच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच गरिबांच्या सोबतीला आहेत. हमाल आणि मापाडी, माथाडी कामगार यांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. व्यापारी वर्गासाठी मोदी सराकारने मागील १० वर्षात विविध योजना आणून त्या प्रभावीपणे राबविल्या आहेत. यामुळे पुन्हा व्यापाऱ्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. आपले एक मत हे मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग बळकट करण्यासाठी आहे.