Stormy Rain : नगरसह तीन जिल्ह्यात पुढील तीन तासांत वादळी पावसाचा इशारा

Stormy Rain : नगरसह तीन जिल्ह्यात पुढील तीन तासांत वादळी पावसाचा इशारा

0
Stormy Rain
Stormy Rain : नगरसह तीन जिल्ह्यात पुढील तीन तासांत वादळी पावसाचा इशारा

कोड रेड

Stormy Rain : नगर : नगरसह तीन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पुढील तीन तासांत वादळी पाऊस (Stormy Rain) हाेणार आहे, असा इशारा हवामान विभागाकडून (Department of Meteorology) देण्यात आला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्तीच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Stormy-Rain
Stormy-Rain

हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान

काळजी घेण्याचे आवाहन (Stormy Rain)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी

या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज (Stormy Rain)

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here