Sujay Vikhe : जनतेसाठी केलेल्या कामांचे पाठबळ निश्चित मिळेल; सुजय विखे यांचा विश्वास

Sujay Vikhe

0
Sujay Vikhe
Sujay Vikhe

Sujay Vikhe : नगर : मागील पाच वर्षांच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. विविध मंत्रालयाच्या माध्यमातून (Through the ministry) निधीची उपलब्धता करून विकासकामांना गती दिली. अडीच वर्षांच्या काेराेनाचा (Corona) कालावधी सोडला, तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहिलो. जनतेसाठी केलेल्या कामांचे पाठबळ निश्चित मिळेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी केला.

हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या

गावागावात विकासकामांसाठी निधीची पूर्तता (Sujay Vikhe)

पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यातील संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, दिनकर पालवे, एकनाथ हटकर, विजय गवळे, साहेबराव गोळे, महादेव कुटे आदी उपस्थित हाेते. सुजय विखे म्हणाले, ”मागील पाच वर्षात मी जिल्ह्यातील विविध प्रश्नांची उकल केली आहे. रस्ते, पाणी, उद्योग विकास, पर्यटन, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे, कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील गावागावात विकासकामांसाठी निधीची पूर्तता केली आहे.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

विविध लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या (Sujay Vikhe)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी काम केले आहे. मला जिल्ह्याच्या विकासासाठी काय करावे लागणार, याची जाण आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरूणांच्या हाताला काम देणे, शिक्षणसाठी सुविधा उभ्या करणे, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, अशी विविध कामे करण्याचा आपला मानस त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला गाढा विश्वास असून नगरकरांच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here