Sujay Vikhe Patil : जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खासदार सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

Sujay Vikhe Patil : जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खासदार सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

0
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : पारनेर : खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आज राळेगणसिद्धी (Ralegan Siddhi) येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची भेट घेतली. यावेळी खासदार विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

हे देखील वाचा : अखेर ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश जारी

दिवाळी सारखा सण साजरा करण्याचे आवाहन (Sujay Vikhe Patil)


नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिदा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिदा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती विखे यांनी अण्णांना दिली.

नक्की वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरण; ३०० मालमत्ता धाेक्यात, घरे खाली करण्यास सुरूवात

भेट आणि आशीर्वाद (Sujay Vikhe Patil)


किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. अण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा, यासाठी साखर-डाळ शिदा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात. त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे, असे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खासदार विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट स्वीकारली. तसेच किट मध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली.

अवश्य वाचा : अकोलेतील शिवसेना नेत्याचा समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश


या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले. तसेच खासदार सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी काशिनाथ दाते, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here