Sujay Vikhe Patil : कर्जत: प्रभू श्रीराम मंदिर (Shri Ram Temple) प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक सोहळा एकट्या भाजपचा (BJP) नसून हा सर्व भारतीयांचा सोहळा आहे, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले. कर्जत येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठाननिम्मित आनंदाचा शिधा साखर आणि डाळ वाटप प्रसंगी ते बोलत होते.
नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे
भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Sujay Vikhe Patil)
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, अभय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, बापूसाहेब नेटके, बाळासाहेब शिंदे, सचिन पोटरे आदी उपस्थित होते. मात्र आमदार राम शिंदेंची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती.
हे देखील वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त
साखर आणि चना डाळ स्वत: केले वाटप (Sujay Vikhe Patil)
खासदार विखे पाटील म्हणाले, प्रभू श्रीरामांचा हा सोहळा सर्वांनी मोठ्या जल्लोषात साजरा करावा. याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटप करण्यात येत आहे. या साखर व चना डाळीचे लाडू बनवून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मात्र ज्यांनी लाडू केले नाही, त्यांचा बंदोबस्त करा, असे आपण प्रभू रामांना सांगणार आहोत, असा खोचक टोला देखील मारला. कार्यक्रमास उशीर झाल्याने अवघ्या १० मिनिटात खासदार सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रम उरकत लाभार्थीना मोकळे केले. साखर आणि चना डाळ वाटपासाठी आणलेल्या गाडीत स्वत: खासदार विखे पाटील टोकन जमा करीत वाटप करीत होते. याप्रसंगी शेखर खरमरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक नंदराम नवले, संजय भैलुमे, अनिल गदादे, विनोद दळवी, शरद मेहेत्रे, पांडुरंग क्षीरसागर, सोमनाथ शिंदे, दिग्विजय देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा सोनमाळी यांनी केले.