Zilla Parishad : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून झेडपीच्या कार्यालयाची ताेडफाेड

Zilla Parishad : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून झेडपीच्या कार्यालयाची ताेडफाेड

0
Zilla Parishad
Zilla Parishad

Ahmednagar News : नगर : जलजीवन पाणी पुरवठा याेजनेचा (Jal Jeevan Mission) वारंवार पाठपुरावा करुनही जिल्हा परिषदमधील (Zilla Parishad) अधिकाऱ्याकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) युवकचे शहराध्यक्ष (शरद पवार (Sharad Pawar) गट) प्रकाश पोटे यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली.

अवश्य वाचा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बुरुडगाव रस्त्यावरील साडेबारा एकरांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द

याेजनेचे काम निकृष्ट दर्जाचे (Zilla Parishad)

Zilla Parishad
Zilla Parishad

भातोडी पारगाव, कोल्हेवाडी, हातवळण गावात जलजीवन याेजनेचे काम निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याचा आराेप जन आधार सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आला. मागील ६ महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. या घोसपुरी योजनेंतर्गत १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.  त्यामध्ये सात नवीन टाक्यांचे व मोठ्या प्रमाणात नवीन पाइपलाइनचे काम सुरू केले आहे. 

नक्की वाचा : बालविवाह जागृती सायकल यात्रेची स्नेहालय येथून सुरुवात

ZP
ZP

अनेकवेळा दिले निवेदन (Zilla Parishad)


मागील आठवड्यात जनआधार सामाजिक संघटनेतर्फे शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत घोसपुरी योजनेत समाविष्ट असणाऱ्या बाबुर्डी घुमट येथील पाइपलाइन पुन्हा खोदून काढली. त्या ठिकाणी केवळ एक ते दीड फूट एवढीच पाइपलाइन जमिनीत गाडली असल्याचे आढळले. शासकीय नियमानुसार पाइपलाइन किमान ३ फूट ९ इंच एवढी खोल असावी. शासननाने हे सर्व निकष लक्षात घेऊनच या योजनेसाठी तब्बल ५ हजार कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केला. परंतु, ठेकेदार हा पैसा वाचवण्याच्या हेतूने आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाइपलाइन फूट भर देखील जमिनीत गाडत नाही. संबंधित या योजनेतील कुठलेही बिल कामाची शहानिशा केल्याशिवाय अदा करू नये, या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ आज संघटनेचे संस्थापक प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय फोडले आहे.

नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे

Zilla Parishad
Zilla Parishad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here