Ajit Pawar : अकोलेतील शिवसेना नेत्याचा समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश

Ajit Pawar : अकोले : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे माजी अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे (Dr. Manoj More) यांनी समर्थकांसह, तसेच अकोले मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला.

0
Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar : अकोले : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे माजी अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे (Dr. Manoj More) यांनी समर्थकांसह, तसेच अकोले मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला.

हे देखील वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित (Ajit Pawar)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजी गर्जे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार बाबाजानी दुर्राणी, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, धुळे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जावेद बिल्डर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बुरुडगाव रस्त्यावरील साडेबारा एकरांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द

राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात (Ajit Pawar)


दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाचा निकाल जाहीर केला असून खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचीच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. अकोलेतही ठाकरे व शिंदे गट असून, ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी समर्थकांसह आमदार लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा गटात जाहीर प्रवेश केला. यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, स्थानिक, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुनच याचा परिणाम किती झाला हे पाहायला मिळेल.

अवश्य वाचा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून जिल्हा परिषद कार्यालयाची तोडफोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here