Maratha Reservation : अखेर ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश जारी

Maratha Reservation : नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठे २० जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. त्यातच मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन शासन-प्रशासनाला धारेवर धरत चांगलेच खडसावले आहे.

0
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation : नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठे २० जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. त्यातच मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन शासन-प्रशासनाला धारेवर धरत चांगलेच खडसावले आहे. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले असून मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कुणबी नाेंदी सापडलेल्या ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) वाटपाचे आदेश दिले आहेत.

नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे

जिल्हाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटपचे आदेश (Maratha Reservation)

मराठ्यांच्या ५४ लाख कुणबीच्या नाेंदी सापडूनही जाणीवपूर्वक कुणबी नाेंदी प्रमाणपत्र देत नसल्याचा आराेप मनाेज जरांगे यांनी केला आहे. मराठवाड्यामध्ये सर्वात कमी नोंदी सापडल्याचा मुद्दा मनोज जरांगे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

आम्ही मुंबईला जाणार (Maratha Reservation)

मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश दिला खरा पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जरांगे पाटील पुढे म्हणाले, काहीही झालं तरी आम्ही मुंबईला जाणार आहोत. सरकारने किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केले, त्याचा डेटा आम्हाला २० तारखेच्या आत द्यावा. आज नोंद सापडली तरी उद्या प्रमाणपत्र देता येतं. ५४ लाख नोंदींपैकी किती लोकांना प्रमाणपत्र दिली, त्याची माहिती सरकारने आम्हाला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अवश्य वाचा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बुरुडगाव रस्त्यावरील साडेबारा एकरांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here