Supriya Sule : ही लढाई माझ्या वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेची : सुप्रिया सुळे

Supriya Sule : ही लढाई माझ्या वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मिततेची - सुप्रिया सुळे

0
Supriya Sule : ही लढाई माझ्या वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मिततेची - सुप्रिया सुळे
Supriya Sule : ही लढाई माझ्या वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मिततेची - सुप्रिया सुळे

Supriya Sule : नगर : आपल्यापेक्षा ताकतवर असलेल्यांशी लढायचे असते. दिल्लीने डोळे वटारले तर महाराष्ट्रातील जे लोक घाबरतात त्यांच्याशी काय लढू. लढायचे तर दिल्लीतील अदृश्य शक्ती विरोधात. माझी सर्वात मोठी ताकद माझी इमानदारी आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) हा भ्रष्ट जुमला पक्ष आहे. ही लढाई माझ्या वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मिततेची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.

हे देखील वाचा : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ


शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर सुरू आहे. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, प्राजक्त तनपुरे आदींसह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : ‘मी स्वतः त्यांचा वध करणार’; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण, ते छत्रपतींची शपथ घेतात मात्र, आरक्षण देत नाहीत. धनगर, मुस्लीम, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो सोडवेल त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील. महाराष्ट्रात राज्याच्या निर्मितीपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेच विकास केला. भाजपने १० वर्षांत राज्यात विकास केलेला नाही. भाजपने स्वतःचा विकास केला. खोके सरकार पक्ष तोडा, कुटुंब फोडात व्यस्त आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव फक्त मी पुढे नेणार. यशवंतराव चव्हाण कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर गेले नाहीत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

आश्वासने
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्यास अंगणवाडी सेविकांचे प्रश्न तातडीने सोडवू, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, महिला सुरक्षा हा सर्वात मोठा कार्यक्रम असेल, बचत गटांना दुकान सुरू करण्यासाठी मदत केली जाईल, एस.टी. महामंडळाची एक वर्षांत स्थिती सुधारू आदी आश्वासने सुप्रिया सुळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here