Supriya Sule : विराेधकांचा २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम हाेईल; सुप्रिया सुळेंचा इशारा

Opponents will have a correct program in 2024; A warning from Supriya Sule

0
288

नगर : खरी शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरेंची आहे. विराेधकांचा आहे ताे गट आहे. ताे काही पक्ष नाही. सत्ता असल्यामुळे त्यांचा ताेरा चाललेला आहे. परंतु, आगामी २०२४ च्या निवडणुकीत (election) त्यांचा करेक्ट कार्यक्रम हाेईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला.

सुळे आज नगरच्या दाैऱ्यावर हाेत्या. त्यांनी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्यावर भाष्य केलं. सुळे म्हणाल्या, ”अजित पवार गटातील काही नेत्याकडून शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात येते. दोन दिवसांपूर्वी अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा फक्त फोटो लावला. मात्र, त्यांचे विचार घेतले नाहीत. भाजपसोबत गेलेले लोक म्हणत आहेत की, शरद पवार हुकूमशाह आहेत. टीका करणाऱ्यांना २०२४ मध्ये कळेलच की, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.” राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांचा सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. देशात एक अदृश्य शक्ती आहे. देवेंद्र फडणवीस यांना देखील या अदृश्य शक्तीने हाफ मुख्यमंत्री करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. मी त्यांच्यासाठी लढणार आहे.” सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here