Suspension :अतिवृष्टीचे अनुदान वाटप भोवले; ‘या’ तालुक्यातील तहसीलदार झाले निलंबित

तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाचा आदेश काढण्याबरोबरच त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. निलंबनाच्या काळात त्यांना नगर जिल्हाधिकारी मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

0
Chandrajeet Rajput

Suspension: राहुरी : राहुरीचे तहसीलदार (Rahuri Tehsildar) चंद्रजीत राजपूत (Chandrajit Rajput) यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे अवर सचिव संजीव राणे (Sanjeev Rane) यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले. त्यांच्यावर मालेगाव (जि. नाशिक) येथे अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पुरामुळे नुकसान (Flood Damage) झालेल्यांच्या अनुदान वितरणात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

चंद्रजीत राजपूत हे मालेगावमध्ये २०२० मध्ये कार्यरत होते. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या अनुदान वाटपात त्यांच्यावर अनियमिततेचा आरोप होता. त्याची चौकशी सुरू होती. यात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. राहुरी तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी तनपुरे सहकारी कारखाना जमीन घोटाळ्यात चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. यानंतर प्रहार जनशक्ती पक्ष आणि तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी तहसीलदार राजपूत यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या.

अवश्य वाचा : आदर्श शिंदेच्या आवाजातलं ‘प्रभू श्रीराम’ गाणं प्रदर्शित  

तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाचा आदेश काढण्याबरोबरच त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. निलंबनाच्या काळात त्यांना नगर जिल्हाधिकारी मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यांना हे मुख्यालय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय सोडता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here