Taapsee Pannu : ठरलं तर मग ! तापसी पन्नू लवकरच चढणार बोहल्यावर

अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच विवाहबंधनात अडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोएसोबत मार्च महिन्यामध्ये लग्न करणार आहे.

0
Taapsee Pannu
Taapsee Pannu

नगर : बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा थाटामाटामध्ये विवाह सोहळा पार पडला. रकुलनंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) लवकरच विवाहबंधनात अडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोएसोबत (Mathias Boe) मार्च महिन्यामध्ये लग्न करणार आहे.

नक्की वाचा : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

तापसी पन्नू उदयपूरमध्ये करणार लग्न (Taapsee Pannu)

तापसी आणि मॅथियास गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात या कपलने लग्नबंधनामध्ये अडकण्याचा निर्णय घेतला आहे. तापसी लग्न करणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तापसीने देखील इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रेमाणे लग्नासाठी उदयपूरची निवड केली आहे. या लग्नाला फक्त तापसी पन्नू आणि मॅथियास बो या दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार हजेरी लावणार आहेत. उदयपूरमध्ये आतापर्यंत प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी या सेलिब्रिटींनी लग्न केले आहे. आता तापसीने देखील लग्नासाठी याच ठिकाणाची निवड केली आहे.

तापसी पन्नू आणि मॅथियास बोए यांचे लग्न शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार होणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्चमध्ये हे कपल लग्न करणार आहेत. पण त्यांच्या लग्नाची तारीख अजून समोर आली नाही. या दोघांकडून देखील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे कपल नेहमी सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. पण ते नेहमीच लाइमलाइट पासून दूर राहतात. 

अवश्य वाचा : मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती

तापसीचा मॅथियास भारताच्या बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक  (Taapsee Pannu)

तापसी पन्नूचा होणारा नवरा मॅथियास हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. तो सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे. मॅथियासने २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. तर २०१५ च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here