Teacher Recruitment : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार 

शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

0
राज्यात आणखी '२०' हजार शिक्षकांची भरती होणार

नगर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात शिक्षक भरतीचा (Teacher Recruitment) प्रश्न रखडलेला पाहायला मिळत आहे. मात्र आता शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड (D.Ed) आणि बीएड् (B.Ed) धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

नक्की वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मागील काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात  १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल झाले आहेत. तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून नगरसाठी १ काेटी ४० लाखांचा निधी

दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरण्यात अडचण येत आहे. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती झाल्यास डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here