Rahul Gandhi : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रमण्यम स्वामींची तक्रार; गृहमंत्र्यांना धाडले पत्र

Rahul Gandhi : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रमण्यम स्वामींची तक्रार; गृहमंत्र्यांना धाडले पत्र

0
189

Rahul Gandhi : नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून येत्या काही दिवसांत राजकारण (politics) तापण्याची चिन्हं आहेत. नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना भाजपचे (BJP) माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पत्र धाडले आहे. राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असून त्यांनी भारतीय संविधनाचे उल्लंघन केले आहे. याबाबत गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही गृहमंत्रालयाने आजवर काेणतेही दखल घेतली नाही. तरी याबाबत तत्काळ पावले उचलावी, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

नक्की वाचा : शिक्षकांचा वंचिताची दिवाळी उपक्रम प्रेरणादायी – अण्णा हजारे

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, राहुल गांधी हे ब्रिटिश पासपाेर्ट बाळगणारे नागरिक आहे. त्यांनी भारतीय संविधनांचे उल्लंघन केले आहे. याबाबत गृहमंत्रालयाकडून अद्यापही काहीच कार्यवाही झाली नाही. गृहमंत्रालयाने तातडीने याबाबत कार्यवाही करावी, असे स्वामी यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, राहुल गांधी जन्माने भारतीय आहे आणि माजी भाजप खासदार स्वामी यांचे दावे काँग्रेस पक्षाने यापूर्वीच फेटाळले आहे.

हे देखील वाचा : खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून नगरसाठी १ काेटी ४० लाखांचा निधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here