IND vs AUS T20 India Squad : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

0
133
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

नगर : वर्ल्ड कपमध्ये भारत पराभूत झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 (IND vs AUS T20) सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाची आज निवड समितीने घोषणा केली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Surykumar Yadav) सोपवण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नक्की वाचा : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता

टी-20 मधून मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. तर शेवटचा सामना ३ डिसेंबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या व्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.

हेही वाचा : खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून नगरसाठी १ काेटी ४० लाखांचा निधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे.

 भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झम्पा यांचा समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here